कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा देणारे 'हे' ठरले भाजपचे पहिले आमदार

 कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा दान करणारे ते पहिले भाजपचे आमदार 

Updated: Aug 23, 2020, 06:23 PM IST
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा देणारे 'हे' ठरले भाजपचे पहिले आमदार title=

शशिकात पाटील, झी मीडिया, लातूर : जिल्ह्यातील औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. जवळपास महिन्याभरापूर्वी ते कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी रक्तातील प्लाझ्मा दान करण्याचे ठरविले. कोरोना पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने प्लाझ्मा दान केल्याने तीन अतिगंभीर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्राण वाचवता येतात. हे समजल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांचे पुत्र परीक्षित पवार यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा दान केला. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा दान करणारे ते भाजपचे पहिले आमदार ठरले आहेत. याआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान केले होते.

कोरोना निगेटिव्ह आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तीने २८ दिवसानंतर प्लाझ्मा दान करावा असे आवाहन यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी केलय. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती.

देण्याची तयारी दर्शविली आहे. लातूर शहराजवळील मांजरा कारखान्याजवळील सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटरमधीलरुग्णांनी हा निश्चय केलाय. यासाठी १५० पैकी ७३  जणांनी तसा फॉर्म भरून शासकीय यंत्रणेकडे दिला आहे.  

इतक्या मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविणारे बहुधा मराठवाड्यातील हे पहिलेच कोविड सेंटर ठरले आहे. कोरोनामुक्त झाल्याच्या २८ दिवस ते ०४ महिन्याच्या कालावधीपर्यंत कोरोनमुक्त रुग्णाला रक्तातील प्लाझ्मा दान करता येतो. 

ज्यामुळे अतिगंभीर तसेच गंभीर स्थितीतील  दोन कोरोना रुग्णांचे जीव वाचविता येतात.  माहिती या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यात आली. आणि त्यानंतरच तब्बल ७३ जणांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविल्याचे माहिती यापैकीच एक असलेल्या कोरोना रुग्णाने दिली आहे. 

मी गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेऊन मी निगेटिव्ह आलो. त्यावेळी मी प्लाझ्मा दान करण्याचे ठरविले असे आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटले.

एका व्यक्तीने प्लाझ्मा दान केल्यास २ ते ४ व्यक्तींचा जीव वाचवता येतो. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी निगेटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा दान करावा. जिल्ह्यातील मृत्यू दर वाढलेला आहे. त्यामुळे मृत्यूदर ही कमी होण्यास मदत होईल असेही अभिमन्यू पवार म्हणाले.