हिंजवडी आयटी नगरीत भररस्त्यातच तरुणावर अंत्यसंस्कार

आयटी नगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या पुण्यातल्या हिंजवडी आयटी नगरीत एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. 

Updated: Jul 8, 2017, 03:30 PM IST
हिंजवडी आयटी नगरीत भररस्त्यातच तरुणावर अंत्यसंस्कार title=

पुणे : आयटी नगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या पुण्यातल्या हिंजवडी आयटी नगरीत एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. 

परमेश्वर बाळासाहेब गवारे या तरुणाचं अल्पशा आजारानं निधन झालं. मात्र जागेअभावी त्यांचा अंतविधी हिंजवडी आयटीच्या भररस्त्यातच करण्यात आला. 

आयटीच्या तिस-या टप्प्यानजिक गवारेवाडी ही साडेतीनशे लोकसंख्येची वस्ती आहे. इथल्या शेतक-यांची शेकडो एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं संपादित केली आहे. त्यामुळे या स्थानिकांचाही हिंजवडीच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. मात्र आजही इथले स्थानिक मूलभूत गरजांसाठी झगडताना दिसतात. 

गवारेवाडीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सोय नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकस महामंडळाला वेळकाढूपणामुळे, आतापर्यंत इथे स्मशानभूमी उभारता आली नाही. याबाबत महामंडळाच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचणींमुळे प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेचं अजून भूसंपादनच झालं नसल्याचं त्यांनी सांगितल.