पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासातील एक तारा निखळला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधाची बातमी वाऱ्यासारखी पसली आणि अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी यानंतर सर्वांनीच गर्दी करण्यास सुरुवात केली. राज ठाकरेंपासून इतरही अनेर नेतेमंडळी आणि कलाकारांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आणि एका उपासक युगाचा इथेच अंत झाला. बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी यावेळी अलोट गर्दी पाहायला मिळाली. तोफांची सलामी देत बाबासाहेबांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
गडकिल्ले, शिवकालीन कालखंड आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सखोल अभ्यास आणि माहिती असणाऱ्या बाबासाहेबांनी महाराजांची कारकिर्द मोठ्या सुरेख पद्धतीनं सर्वांसमोर आणली.
बाबासाहेब आज आपल्यातून गेले असले तरीही त्यांच्या लेखणीतून आणि अनुभवांतून साकारलेली अनेक उदाहरणं कायमच नव्या पिढीला प्रेरणा देत राहतील यात शंका नाही.