राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला.  

Updated: Sep 9, 2020, 09:46 PM IST
राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण  title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १८० झालीय. तर आतापर्यंत १७ हजार ९७२ पोलिस कोरोनाबाधित झालेत. त्यापैकी सध्या ३ हजार ५२३ पोलिस कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १४ हजार २६९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 

येवल्यात १२ कोरोनाबाधितांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४५२ झालीय. तर गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झालाय.त्यामुळे आता पर्यंत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.तर आतापर्यंत कोरोनावर ३२५ जणांनी मात करत घरवापसी केलीय आणि उर्वरित ९२ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

अकोल्यात दिवसभरात १५५ नवे रुग्ण सापडलेयत. २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ४ हजार ९६४ रुग्ण आहेत. तर आजवर कोरोनानं जिल्ह्यात १७२ जणांचा बळी घेतला. तर ३ हजार ७२६ जण कोरोनामुक्त झाले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा आहे १ हजाराच्यापुढे आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांचा आकडा वाढायला लागलाय. आज तब्बल १७२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ऍक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २०६ वर गेलीय. तर जिल्ह्यात एकूण ४ हजार ३६३ रुग्ण आढळले. तसेच आतापर्यंत ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 

वर्ध्यात आज १८५ नवे रुग्ण वाढलेय. जिल्ह्यातले एकूण रुग्ण झालेयत २ हजार १११ तर आतापर्यंत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे ९८३ तर १ हजार ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.