अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली

Landslide : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली असून वाहतूक बंद झाली आहे. ( Landslide on the Alibag Murud road )  

Updated: Sep 7, 2021, 08:13 AM IST
अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली title=

अलिबाग :  Landslide : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली असून वाहतूक बंद झाली आहे. ( Landslide on the Alibag Murud road ) कोर्लई गावाजवळ मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. ही घटना रात्री 12 वाजता घडली. दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद होती. दरम्यान, ही दरड बाजुला करण्याचे काम सुरु आहे.

रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, पावसामुळे दरड हटवण्यात अडथळे येत आहेत. पहाटे पाऊस थांबताच पुन्हा दरड बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले. आता दरड बाजूला करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.