धुळ्यात मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

Updated: May 22, 2019, 01:46 PM IST
धुळ्यात मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी केली आहे. तसेच त्या भागातले मोबाईल टॉवर हे बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मागण्या केल्या आहेत.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मतमोजणी प्रक्रियेत आणि मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड किंवा गैरप्रकार होणार नसल्याचा विश्वास शिष्टमंडळाला पुढे व्यक्त केला आहे. सुरुवातीला टपाली मतदानाची मतमोजणी होईल,  त्यानंतर 15 ते 19 फेऱ्या दरम्यान मतमोजणी पार पडणार आहे. ही मतमोजणी पार पडल्यानंतर पाच विविध यंत्रांच्या चिठ्ठीची मोजणी करण्यात येणार आहे.