मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोकणातील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. कोरोना संसर्गामुळे गेली सहा महिने मतदारसंघांतील विकासकामांना खिळ बसली होती. त्यामुळे आमदारांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना आमदारांच्या विभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपासून शिवसेनेच्या विभागवार आमदारांच्या बैठका घेणे सुरु केले आहे. वर्षा बंगल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसदर्भात चर्चा करण्यात आली. गेली सहा महिने कोविड १९ चा संसर्ग सुरू असल्यामुळे आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाली नव्हती.
विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता यासंदर्भात बैठक झाली. सर्व अडचणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मतदारसंघातील प्रश्न सोडवून विकासाला गती देण्यासंदर्भातच बैठक झाली, अशी माहिती शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना भेटणार नाही तर कोणाला भेटणार, असा सवाल उपस्थिक करत विभागवार आमदारांच्या बैठका होणार आहेत. स्थानिक प्रश्न मार्गी लागतील. गेले अनेक दिवस व्हर्चुअल मीटिंग्स होत होत्या, आता आमनेसामने बैठका होतील, असे परिवहन मंत्री
अनिल परब म्हणाले.