मुंबई : कोकण रेल्वेकडून पावसाळ्यात दरवर्षी स्वतंत्र वेळापत्रकाची आखणी केली जाते त्यानुसार कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून अमलात येणार आहे. हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असून कोकण रेल्वे मार्गावर रोहापासून ठोकूरपर्यंतचा वेग ताशी ११० ऐवजी ७५ राहणार आहे.
अतिवृष्टी झाली तर हा वेग ताशी ४० ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या दरम्यान गस्तीसाठी जादा कुमक मागवण्यात आलीय. तसेच रत्नागिरी, बेलापूर आणि मडगाव याठिकाणी २४ तास नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. गाड्यांचा वेग मंदावणार असल्यामुळे प्रवाशांना मात्र विलंबाला सामोरं जावं लागणार आहे.