शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात बेडूक, विद्यार्थी संतापले

 ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला 

Updated: Jan 6, 2020, 02:00 PM IST
शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात बेडूक, विद्यार्थी संतापले  title=

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. विद्यापीठ प्रशासन यावर अद्याप प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.

गेली अनेक वर्षे विद्यार्थी इथल्या पाणी सुविधेचा वापर करत आहेत. हे पाणी शुद्धीकरण करुन येत असल्याचा विद्यापीठाचा दावा असतो. शुद्धीकरण केलेल्या पाण्यात जर बेडूक असेल तर इतके वर्षे हे विद्यार्थी पाणी पितात ते शुद्ध आहे का ? हे पाहणे महत्वाचे आहे.

नेमकं काय घडलं आहे ? याची माहिती आम्ही घेऊ असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.