कुमारी मातांची अर्भकं विकणाऱ्या डॉक्टरचे आर्थिक व्यवहार उघड

इचलकरंजीत कुमारी मातांची अर्भकं दोन लाख रुपयांना विकणाऱ्या डॉ. अरुण पाटीलनं आर्थिक व्यवहारांसाठी इचलकरंजीतल्या एका पतसंस्थेत खातं उघडल्याचं पुढं आलंय.  

Updated: Feb 9, 2018, 03:38 PM IST
कुमारी मातांची अर्भकं विकणाऱ्या डॉक्टरचे आर्थिक व्यवहार उघड title=

इचलकरंजी : इचलकरंजीत कुमारी मातांची अर्भकं दोन लाख रुपयांना विकणाऱ्या डॉ. अरुण पाटीलनं आर्थिक व्यवहारांसाठी इचलकरंजीतल्या एका पतसंस्थेत खातं उघडल्याचं पुढं आलंय.  

खात्यात दोन लाख रूपये

अरुण पाटील आणि पीडित मुलीच्या पतसंस्थेतल्या खात्यात दोन लाख रुपये जमा करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. मुलगी अल्पवयीन असल्यानं अरुण पाटीलनं पतसंस्थेत खातं उघडलं. 

अजून माहिती उघड

याप्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलिसांनी तपासातील आणखी माहिती दिलेली नाही. सध्या पुढे आलेली माहिती मुंबई आणि मराठवाड्यात पाठवण्यात आलेल्या पथकांच्या चौकशीत पुढे आलंय.

काय आहे प्रकरण?

इचलकरंजीमधील जवाहरनगर भागातल्या डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकानं धाड टाकली होती. या ठिकाणी कुमारी मातांची प्रसुती बेकायदेशीरपणं केली जात असल्याचं उघड झालं. इतकंच नव्हे तर या कुमारी मातांना दोन लाख रुपये देऊन ही बालकं डॉ. पाटील विकत घेत असे आणि नंतर त्या बालकांची विक्री करत असे, असा गंभीर प्रकार समोर आलाय.

यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय. केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग, जिल्हा महिला आमि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकानं ही धाड टाकली. प्राथमिक तपासात छत्तीसगड आणि मुंबईमध्ये दोन बाळांची विक्री झाल्याची माहिती समोर आलीय. पथकानं डॉ. पाटील यांच्या हॉस्पीटलमधील सर्व कागदपत्रे जप्त केलीत. या प्रकरणी डॉ. अरुण पाटील, त्यांची पत्नी, हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय.