पुराचा फटका : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांच्या रांगा

पुणे-बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद आहे.  

Updated: Aug 9, 2019, 02:18 PM IST
पुराचा फटका : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांच्या रांगा title=

कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद आहे. कराडजवळील तासवडे टोलनाक्याच्या पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाणारी महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. या मार्गिकेवर ट्रक आणि कंटेनर उभे करण्यात आले आहेत. तर पुण्याकडे जाणार्‍या मार्गिकेवरून पुणे - कराड अशी लहान गाड्यांची दुहेरी वाहतूक सुरू आहे. 

नेहमी वाहतुकीने गजबजलेल्या या महामार्गाचा तासवडे टोलनाक्याजवळ भली मोठी रांग दिसून येत आहे. कोल्हापूर, सांगलीतील पुरामुळे मुंबई - बंगळुरू महामार्गावर किकवी येथे ट्रक थांबवून ठेवले आहेत. शेकडो ट्रक गेले चार दिवस झाले महामार्गालगत उभे आहेत.