अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार 'या' सुविधा

Ambabai Darshan Development Plan:  करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी 275 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. 

Updated: Jan 9, 2024, 11:16 AM IST
अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार 'या' सुविधा  title=

Ambabai Darshan Development Plan: अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून भाविक येत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या अंबाबाईचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. अगदी पार्किंगपासून ते दर्शनापर्यंत भाविकांना कोणती अडचण येऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद सुनील पाटील यांनी आराखड्याचे सादरीकरण केल आहे. या आराखड्यासाठी 275 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. हा आराखडा साडेचार हेक्टर एवढ्या जागेत होणार असून त्यामध्ये इमारत, पार्किंग, दर्शन मंडप, हेरिटेज हॉल यासह विविध सोयी सुविधा याचा समावेश आहे.

विकास आराखड्यामध्ये पुढील बाबींचा समावेश 

अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा  330 चार चाकी वाहने, 650 दुचाकी वाहने, सात बस आणि तीन मिनी बस क्षमता असणारे पार्किंग स्लॉट, 162 दुकाने आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल, 5000 आसन क्षमता असणारा दर्शन मंडप आणि 44 स्वच्छतागृहांचा समावेश आहे. 

यासोबतच भाविकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर, विविध सण उत्सव साजरे करण्यासाठी स्वतंत्र सभागृह, लाईट आणि साऊंड शो सादर करण्यासाठी भवानी मंडपात हेरिटेज प्लाझा, प्रदर्शनासाठी सभागह, बिनकामी मंदिर आणि अन्य परिसरात जाण्यासाठी स्वातंत्र आणि सुरक्षित मार्ग, पुरातत्त्व यादी मधील मंदिर आणि ईमारतीचे संवर्धनाचा समावेश आहे.

भाविकांना अडचणीचा सामना 

अंबाबाई मंदिर परिसरातून जाणाऱ्या भूयारी गटारीचे काम महापालिकेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. 10 जानेवारीपासून 8 जुलै पर्यंत हे काम चालणार असून भाविकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. 180 दिवस या कामाचे नियोजन असून ज्योतिबा रोड, घाटी दरवाजा समोरील रस्ता, खर्डेकर पॅसेज तसेच भवानी मंडप येथील पोलीस स्टेशन समोरील रस्ता काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावे लागणार आहे.