प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या

Kokan Railway News: . रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळं काही गाड्या रद्द केल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 1, 2023, 01:25 PM IST
प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या  title=
kokan railway news Goods Train Derails at raigad Disrupts Rail Services In railway cancelled 12 train

Kokan Railway News Update: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. रोह्याजवळ मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्यांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. 

कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना हाल सोसावे लागत आहेत. वेगवेगळ्या स्थानंकांवर गाड्या अडकून पडल्या आहेत. शेकडो प्रवासी गेल्या कित्येक तासांपासून ट्रेनमध्येच अडकून पडले असून प्रवासी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशातच कोकण रेल्वेकडून 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

कोकण रेल्वेकडून या 12 गाड्या रद्द

30 सप्टेंबरच्या या गाड्या रद्द

07105 पनवेल-खेड मेमू स्पेशल, 01155 दिवा-चिपळूण मेमू स्पेशल, 01165 एलटीटी मेन स्पेशल, या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. 

01 ऑक्टोबर रोजी रद्द होणाऱ्या गाड्या

01156 चिपळूण-दिवा मेमू स्पेशल,07105 पनवेल-खेड मेमू स्पेशल,07106 खेड-पनवेल मेमू स्पेशल,10103 सीएसएमटी-मांडवी एक्स्प्रेस,01171 सीएसएमटी- सावंतवाडी एक्स्प्रेस, 20112 कोकणकन्या एक्स्प्रेस, 11004 तुतारी एक्स्प्रेस, 01172 सावंतवाडी-सीएसएमटी स्पेशल, 11099 एलटीटी-मांडवी एक्स्प्रेस या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. 

मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 6 तास उशिराने धावत आहेत. तर गणपती स्पेशल गाड्या 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. करमाली पनवेल गणपती विशेष गाडी ४ तासांपासून माणगाव स्थानकात थांबली आहे. 

दरम्यान, मंगळुरू एक्स्प्रेस दिवा स्थानकात रखडल्यामुळं गाडीतील संतापलेल्या प्रवाशांनी रेलरोकोचे हत्यार उपसले आहे. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहुकीवर झाला होता. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रखडलीय. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दरम्यान गाडी पुणेमार्गे मंगळुरूकडे नेण्याची तयारी रेल्वेने दाखवली. मात्र गाडीतल्या प्रवाशांचा त्याला विरोध आहे. गाडी कोकण रेल्वेमार्गेच न्यावी असं प्रवाशांची मागणी आहे. त्यासाठी दिवा स्थानकात प्रवाशांनी रेलरोको केला होता.

सुमारे 40 मिनिटे रेल्वे रोखून धरल्या नंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसना यश आले आहे. त्यानंतर लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात येत आहे.