kirtan News : कीर्तनकार महाराजांचा स्वॅगच वेगळा, चक्क हॅलिकॉप्टरमधून एन्ट्री

kirtan News : एखाद्या कीर्तनकाराने हेलिकॉप्टर प्रवास करणे तसा दुर्मिळ प्रकार. मात्र, या महाराजांची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. महाराजांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची का वेळ आली, याची अनेकांना उत्सुकता आहे.

Updated: Jan 6, 2023, 11:23 AM IST
kirtan News : कीर्तनकार महाराजांचा स्वॅगच वेगळा, चक्क हॅलिकॉप्टरमधून एन्ट्री title=
Kirtankar Maharaj helicopter journey

Pune kirtan News : पुण्यातल्या कीर्तनकार महाराजांची राज्यभरात जोरदार चर्चा रंगत आहे. (Maharashtra News in Marathi) निमित्त आहे ते कीर्तनकार महाराजांची हेलिकॉप्टरमधून झालेली एन्ट्री. ह.भ.प. समाधान महाराज शर्मांचा सांगलीत रामकथेचा कार्यक्रम आहे. महाराजांना पुण्यातल्या वाघोलीच्या कीर्तन (kirtan News ) महोत्सवाचंही निमंत्रण होतं. सांगली ते वाघोली हे अंतर 5 तास 17 मिनिटांचं आहे. सांगलीतली कथा संध्याकाळी 5 वाजता संपणार होती. तेव्हा दोन तासांत पुणे गाठणं अशक्य होत असल्याचं पाहताच आयोजकांनी महाराजांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज शर्मा हे फक्त काही मिनिटांत वाघोलीत कीर्तनासाठी (kirtan ) संध्याकाळी पोहोचले. हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमस्थळी दाखल होताच महाराजांचं जोरदार स्वागत करण्यात आले.

कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे...

बीड येथील प्रसिद्ध राम कथाकार आणि कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना वाघोली येथील कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून महाराजांना आणण्याची व्यवस्था केली. त्यामुळे बीड येथील कीर्तनकार आणि कथाकार समाधान महाराज शर्मा यांना हवाई प्रवास करता आला आणि आयोजकांनी थेट प्रवासासाठी हेलिकॉप्टर पाठवल्यामुळे याची महाराष्ट्रभरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यातील वाघोली येथे कीर्तनासाठी निमंत्रण

केज येथील प्रसिद्ध राम कथाकार आणि कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा सुरु आहे. काल गुरुवारी जानेवारी रोजी पुण्यातील वाघोली येथे सायंकाळी सात वाजता ते कीर्तनासाठी निमंत्रित होते. परंतु सांगली येथील गुरुवारची रामकथा संध्याकाळी पाच वाजता संपणार होती. सांगली ते वाघोली हे अंतर 247 किलो मिटर असून त्यांना वाघोली येथे पोहोचण्यासाठी साडे पाच तास लागणार होते. 

हा प्रवास कमी वेळेत करणे त्यांना शक्य नसल्याने वाघोली येथील कीर्तन महोत्सवाचे आयोजक आणि भाविकांनी त्यांना हेलिकॉप्टरने सांगलीतून वाघोलीला कीर्तनसाठी नेले. त्यामुळे बीड येथील प्रसिद्ध कथाकार असलेल्या समाधान महाराज शर्मा यांना आपल्या अवलिया आयोजक भाविकांना केलेल्या हेलिकॉप्टरच्या सुविधेमुळे आनंद व्यक्त केलाय. तर वारकरी संप्रदायात प्रती असलेली त्याची निष्ठाही दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितले.