किरीट सोमय्या कोर्लई गावात, कुठलेच बांधकाम नाही - सरपंच

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई या गावात येणार आहेत.(Korlai village) रश्‍मी ठाकरे यांच्या कोर्लईतल्या जागेवर असणाऱ्या 19 बंगल्यांचा मुददा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

Updated: Feb 18, 2022, 08:24 AM IST
किरीट सोमय्या कोर्लई गावात, कुठलेच बांधकाम नाही - सरपंच title=

अलिबाग : Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई या गावात येणार आहेत.(Korlai village) मुख्‍यमंत्री उदधव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या कोर्लईतल्या जागेवर असणाऱ्या 19 बंगल्यांचा मुददा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोमय्या यांचा दावा सरपंच यांनी खोडून काढला आहे. तसेच जमीन मालकही पुढे आले आहेत. त्यांनी हा पारदर्शक व्यवहार झाल्याचे म्हटले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्या जागेवर कुठलंच बांधकाम नसल्याचा दावा केला होता. शिवाय कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मात्र सोमय्या अजूनही आपल्या दाव्यावर ठाम आहेत. 

किरीट सोमय्या याचसंदर्भात कोर्लई ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. त्यानंतर त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीबाबतची माहिती घेण्यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्यात जातील. संध्याकाळी 4 वाजता ते जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. सोमय्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिला. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.