विहिरीत पडून चिमुरडीचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने पहिला बळी घेतला आहे.

Updated: May 9, 2019, 10:57 PM IST
विहिरीत पडून चिमुरडीचा मृत्यू title=

प्रशांत परदेशी धुळे : धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने पहिला बळी घेतला आहे. धुळे तालुक्यातील मोरदड तांडा येथील नंदिनी नथु पवार या तेरा वर्षे मुलीचा पाणी भरत असताना मृत्यू झाला आहे. नंदिनी गावाजवळ असलेल्या एका खासगी विहिरीवर पाणी भरायला गेले होते, त्याठिकाणी तिचा पाय घसरला आणि ती चाळीस फुटापेक्षा अधिक खोल असलेल्या विहिरीत जाऊन पडली.

नंदिनीचा विहिरीत पडल्याबरोबर जागीच मृत्यू झाला. मोरदड तांडा या गावाची लोकसंख्या ही २२०० असून, या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही फक्त दोन टॅंकरच्या फेऱ्यानी पाणीपुरवठा या ठिकाणी केला जातो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने भीषण पाणी टंचाई आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली गेल्यामुळे  नंदिनीला आपला जीव गमवावा लागला आहे.