यवतमाळ : यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभाग आता इटालियन कुत्र्यांची मदत घेणार आहे. २७ दिवस झाले तरी नरभक्षक टी-वन वाघीण अद्याप बेपत्ता आहे. त्यामुळे या वाघिणीच्या शोधासाठी खास इटालीयन केन कोर्सो जातीचे कुत्रे बोलवण्यात आलेत.
केन कोर्सो जातीचे दोन कुत्रे यवतमाळमध्ये दाखल झाले असून लवकरच ते टी-वन वाघिणीच्या शोधमोहिमेत सामील होणार आहे.
दरम्यान, नवाब अली या खास शूटरला वनविभागानं पाचराण केल्याची बातमी आम्ही दाखवली होतीच. आज नवाब अली आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत टीवनच्या शोध मोहिमेला गती देण्यात आली आहे.