सातव्या वेतन आयोगासाठी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी

Updated: Sep 11, 2019, 03:59 PM IST
सातव्या वेतन आयोगासाठी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन title=

कल्याण | महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं. या आंदोलनात अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची अंमलबजावणी केली. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. महापालिका आयुक्त, महापौरांना निवदेनही देण्यात आलं आहे. परंतु त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

राज्य सरकार आणि राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली होती. १३ तारखेला होणाऱ्या महासभेत मंजुरी द्यावी अन्यथा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा देखील देण्यात आला.

गणेशोत्सानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय़ घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.