कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले

Pune Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते.मात्र, प्रचाराच्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil )  यांंनी Who is Dhangekar? असा सवाल केला होता. आता त्याला कोल्हापुरात पोस्टर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Updated: Mar 4, 2023, 12:21 PM IST
कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले title=

Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे ( Maha Vikas Aaghadi ) उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) विजयी झाले आणि महाविकास आघाडीत मोठी जल्लोष पाहायला मिळाला. या विजयानंतर भाजपला जोरदार टोलेबाजी केली आहे. जे मस्तीत होते त्यांची चांगलीच जिरली आहे. त्यांचा माज उतरला आहे, अशी प्रतिक्रीया विरोधकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. दरम्यान, या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी प्रचारादरम्यान, Who is Dhangekar या सवाल केला होता. धंगेकर यांच्याविजयानंतर चंद्रकांत पाटील यांना धंगेकर कोण आहेत, हे आता समजले असेल, असा टोला महाविकास आघाडीने लगावला आहे. दरम्यान, आता कोल्हापुरात This is Dhangekar असे पोस्टर झळकले आहे.

"Who is Dhangekar? कसबा तो झाकी है, कोथरुड अभी बाकी है" 

पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है, कोथरुड अभी बाकी है" अशा मजकुराचे बॅनर्स लावण्यात आले होते. Who is Dhangekar? असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भर सभेत विचारला होता. त्यामुळे त्यांना डिवचण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालाच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावण्यात आले होते.  कसबा पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांना तब्बल 10950 मतांनी पराभव केला. तर 14 जणांना या निवडणुकीत आपली अनामत रक्कम गमवावी लागली. महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. कोल्हापुरात ताराराणी चौकात रवींद्र धंगेकर यांचे पोस्टर झळकले आहे. This is Dhangekar आशयाचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरमधून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी Who is Dhangekar म्हणत सवाल केला होता. या उत्तर म्हणून महाविकास आघाडीने पोस्टर लावले.