दोघं सोबत फिरतात म्हणून टोळक्यांकडून तरुण-तरुणीला मारहाण, व्हीडिओ व्हायरल

महाराष्ट्रचंही उत्तर प्रदेश होतंय का, असा सवाल पुन्हा उपस्थित केला जातोय. हा सवाल करण्यामागे घटनाही तशीच काहीशी घटना उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील चाळीसगाव इथं घडली आहे.   

Updated: Dec 22, 2021, 09:57 PM IST
दोघं सोबत फिरतात म्हणून टोळक्यांकडून तरुण-तरुणीला मारहाण, व्हीडिओ व्हायरल title=

जळगाव : महाराष्ट्रचंही उत्तर प्रदेश होतंय का, असा सवाल पुन्हा उपस्थित केला जातोय. हा सवाल करण्यामागे घटनाही तशीच काहीशी घटना उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील चाळीसगाव इथं घडली आहे. दोघं सोबत का फिरतात, असा जाब विचारत सोबत फिरणाऱ्या तरुण-तरुणीला टोळक्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Jalgaon Chalisgaon couple was harassed by some people video viral) 

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कन्नडमधला हा व्हिडीओ असल्याचं समोर आलंय. या व्हिडिओमध्ये दोघं सोबत का फिरतात? या बद्दल विचारणा करून तरुण तरुणीला गावगुंडांनी अचानक येऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तर तरुणाच्या डोक्यात फरशी घातली. तसंच त्याचा मोबाईलही फोडला.

या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. तसेच या घटनेमुळे महाराष्ट्रचंही उत्तर प्रदेश होतोय का, असा सवाल या घटनेनिमित्त उपस्थित होत आहे.