मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होतेय. या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी संवादाच्या सुरुवातीला राज्यातील जनतेचे आभार मानले. तसंच तौत्के वादळामध्ये जनेतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्प्ष्ट केलं. (It is a bad thing to impose restrictions on the people who love us said Chief Minister Uddhav Thackeray)
आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर निर्बंध लादणं कटू काम
"जी जनता आपल्यावर प्रेम करते, आपल्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानते, त्यांच्यावर निर्बंध लादणं यासारखं कटु काम नाही. पण मी हे राज्याच्या काळजीपोटी हे कटु काम करावं लागतंय", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
जनतेवरती निर्बंध लादणे... जी जनता आपल्यावर प्रेम करते, आपल्याला त्यांच्या कुटुंबातील मानते, त्यांच्यावर निर्बंध लादणे यासारखे कटु काम नाही.
- Hon'ble CM #UddhavThackeray ji #Maharashtra #MaharashtraWithCM— Anagha Acharya - अनघा आचार्य (@AnaghaAcharya) May 30, 2021
संबंधित बातम्या :
Corona ची तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही, गाव कोरोनामुक्तीचा संकल्प करा : मुख्यमंत्री