संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामील

ISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

राजीव कासले | Updated: Jul 13, 2024, 09:46 PM IST
संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामील  title=

विशाल करोळे झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : इसिस (ISIS) ही धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणारी ही संघटना आहे .  याच दहशतवादी संघटनेनं (Terrorist Organization) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambaji Nagar) आपलं जाळं पसरवलंय. छत्रपती संभाजीनगरमधले 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. इसिसच्या संपर्कात आलेल्या या तरुणांना स्फोटकं तयार करणं. घातपात कसा घडवायचा आणि त्यानंतर कसं पळून जायचं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जात होतं. तरुणांचं ब्रेनवॉश करण्यासाठी व्हिडिओ दाखवले जात असल्याचंही समोर आलंय. एनआयएच्या आरोपपत्रातूनच हा मोठा उलगडा झालाय.

50 तरुण ISISच्या जाळ्यात? 
संभाजीनगरातील 50 तरुण ISISच्या जाळ्यात असल्याची धक्कादायक माहिती मोहंमद जोएबच्या चौकशीत समोर आली आहे. जगभरात ISISचं जाळं पसरवण्याचा मोहंमद जोएबचा प्लान होता. यासाठी जोएबनं संभाजीनगरात एक व्हॉट्सअप ग्रूप बनवला होता. ग्रूपमध्ये 50 पेक्षा जास्त जणांचा समावेश करण्यात आलं होतं. त्यांना शपथ देऊन भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा जोएबचा मानस होता. व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ शेअर केले जायचे. भारतात कुठे, कसे दहशतवादी हल्ले करायचे याचा प्लॅनही ठरला होता. हल्ले झाल्यानंतर अफगानिस्तान, तुर्कीत पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.

संभाजीनगरमधून एनआयएने अटक केलेल्या मोहंमद जोएब खानच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. संभाजी नगरचा मोहंमद जोएब आणि जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहंमद शोएब यांनी संभाजी नगरात एक व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. जोएबच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार करण्यात आल्याचं एनआयएच्या दोषारोपपत्रात म्हटलंय.. 

कोण आहे मोहंमद जोएब खान?
मोहंमद जोएब हा सामान्य कुटुंबातील तरुण आहे. फेब्रुवारीत एनआयएने संभाजीनगरात 9 ठिकाणी छापे मारले होते, त्यात जोएबला अटक करण्यात आली होती. जोएब विवाहित असून त्याला 2 मुली आहेत. जोएबचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. जोएब बंगळुरुत नोकरी करत होता. वर्क फ्रॉम होम असल्याचं सांगत घरून काम करत होता. जोएबचे 2 भाऊ आखाती देशात नोकरी करतात. 1 भाऊ आयटी इंजिनिअर असून तो इसिसचं मोठं नेटवर्क असलेल्या लिबियातील एका कंपनीत काम करतो

मात्र वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली जोएबनं संभाजीनगरात स्लीपर सेल्सचं जाळं पसरवण्याचं काम सुरु केलं. वेगवेगळ्या भागातील तरुणांनी एकत्र केलं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तो स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता. मात्र, घातपातचा कट रचण्याआधीच एनआयएनं त्याला ताब्यात घेत कट उधळून लावला.