दिग्दर्शक नागराज मंजुळेमुळे पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अडचणीत?

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

Updated: Feb 5, 2018, 08:59 PM IST
दिग्दर्शक नागराज मंजुळेमुळे पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अडचणीत? title=

पुणे : चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

काय आहे प्रकरण?

विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकार, विद्यापीठ व्यवस्थापक परिषद, उच्च शिक्षण संचालनालयाची परवानगी न घेताच नागराज मंजुळे यांना मैदान भाड्याने दिल्याचा आरोप होतोय. याशिवाय ४५ दिवसांचा करार होऊनही १२० दिवसांनंतरही सेट तसाच मैदानावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय. 

विद्यापीठावर कारवाई होणार?

या संदर्भात मानवी हक्क संरक्षण समितीने केलेल्या तक्रारीनंतर तहसीलदार कार्यालयाने कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तर उच्च शिक्षण संचालनालयानेही याबाबत विद्यापीठाकडून अहवाल मागवलाय.