रुग्णवाहिका चालकांची मनमानी रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचा पुढाकार

माफक दरात उपलब्ध करून दिली सुसज्ज कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा

Updated: May 13, 2021, 08:41 PM IST
रुग्णवाहिका चालकांची मनमानी रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचा पुढाकार title=

आतिष भोईर, कल्याण : सध्याची कोविड परिस्थिती आणि कोविड रुग्णवाहिका चालकांची मनमानी आणि लोकांची होणारी परवड कमी करण्यासाठी कल्याणातील एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कल्याणकरांसाठी माफक दरात 'कार्डिऍक ऍम्ब्युलन्स' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत या कार्डिऍक ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. 

गेल्या वर्षीपासून कल्याणमधील व्यवसायिक आणि सामाजिक जाणिव असणाऱ्या चव्हाण कुटुंबीय लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत. चव्हाण प्रतिष्ठानच्या साहेबराव चव्हाण यांनी नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आणि सामाजिक गरज ओळखून माफक दरात कार्डिऍक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. 

मिलिंद चव्हाण आणि सुनील चव्हाण या बंधूंनी अवघ्या काही दिवसांत आपल्या वडिलांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या कार्डिऍक ऍम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, मॉनिटर, तज्ञ डॉक्टर अशी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'ना नफा आणि ना तोटा" या तत्वावरील माफक दरात ही कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.