ह.भ.प.इंदुरीकरांनी वादग्रस्त मुद्यावर भाष्य टाळलं

वादग्रस्त विधानामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदोरीकर महाराज यांचे मालेगांवच्या बारा बलुतेदार संघटनेतर्फे

Updated: Feb 19, 2020, 09:38 PM IST
ह.भ.प.इंदुरीकरांनी वादग्रस्त मुद्यावर भाष्य टाळलं title=

मालेगाव : वादग्रस्त विधानामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदोरीकर महाराज यांचे मालेगांवच्या बारा बलुतेदार संघटनेतर्फे आयोजित कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून वादग्रस्त मुद्द्यावर भाष्य करणे टाळले. मालेगावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

यावेळी त्यांच्या समर्थकांनी "आम्ही इंदोरीकर महाराजांच्या सोबत आहोत" ,"आय सपोर्ट इंदोरीकर महाराज" असे फलक झळकावून इंदोरीकर महाराज यांचे समर्थन केले. यावेळी कृषिमंत्री दादा भुसेही व्यासपीठावर उपस्थित होते. 

समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा यावेळी गौरव करण्यात आला. समाजातील विविध रूढी परंपरा इंदोरीकर महाराजांनी प्रहार करीत खास आपल्या विनोदी शैलीमध्ये आपल्या दीड तासाच्या किर्तनाने समाज प्रबोधन केले. मालेगांव पंचक्रोशीतील हजारो श्रोत्यांनी कीर्तनाला मोठी गर्दी केली होती.