पश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा कालावधी संपला असला तरीदेखील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने वेळापत्रकात बदल झाले आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2023, 11:13 AM IST
पश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल title=
Indian Railways to operate 27 more new AC local train services on western railway from monday

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील खार ते सांताक्रुझदरम्यान सुरु असलेले काम अखेर पूर्ण झाले आहे. या नंतर आज सोमवारपासून लोकल सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, लोकलसेवा जरी सुरळीत झाली असली तरी पश्चिम रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण प्रशासनाने साध्या लोकल फेऱ्या रद्द करुन 17 वाढीव एसी लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाने एसी लोकलच्या प्रवाशांना दिलासा मिळाला असली तरी इतर प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. 

सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत धावणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून एसी लोकलच्या आणखी 17 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. त्यामुळं आता पश्चिम रेल्वेवरील लोकलची संख्या 79 वरून 96 इतकी होणार आहे. एसी लोकल फेऱ्या सोमवार ते शुक्रवार चालवण्यात येतील तर शनिवार आणि रविवार सामान्य म्हणून चालवण्यात येणार आहेत. 

रेल्वे प्रशासनाने 17 एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतल्याने वेळापत्रकात बदल होणार आहे. डहाणू ते अंधेरी दरम्यान धावणारी लोकल आता चर्चगेटपर्यंत चालण्यात येणार असल्याने वेळेत बदल होणार आहे. 17 एसी लोकलपैकी 9 फेऱ्या अप दिशेला तर 8 फेऱ्या डाऊन दिशेला चालवण्यात येणार आहे. 

अप दिशेला ( चर्चगेटकडे ) नालासोपारा-चर्चगेट, विरार-बोरीवली आणि भाईंदर-बोरीवली दरम्यान प्रत्येकी एक फेरी, विरार-चर्चगेट दरम्यान दोन फेऱ्या आणि बोरीवली-चर्चगेट दरम्यान चार फेऱ्या तर डाऊन ( विरारकडे ) दिशेला चर्चगेट-भाईंदर आणि बोरीवली-विरार दिशेला प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार आणि चर्चगेट- बोरीवली दरम्यान प्रत्येकी तीन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

अप दिशेच्या फेऱ्या

1) नालासोपारा – स. 4.55 वा. – चर्चगेट – स. 6.30 वा. – धीमी

2) बोरीवली – स. 7.47 वा. – चर्चगेट – स. 8.41 वा. – जलद

3) बोरीवली – स. 9.35 वा. – चर्चगेट – स. 10.29वा. – जलद

4) बोरीवली – स. 11.23 वा. – चर्चगेट – दु. 12.12 वा. – जलद

5) विरार – दु. 1.34 वा. – चर्चगेट – दु. 2.52 वा. – जलद

6) विरार – सायं. 4.48 वा. – बोरीवली – सायं. 5.26 वा. – धीमी

7) बोरीवली – सायं. 5.28 वा. – चर्चगेट – सायं. 6.17 वा. – जलद

8) विरार – रा. 7.51 वा. – चर्चगेट – रा. 8.15 वा. – जलद

9) भाईंदर – रा. 10.56 वा. – बोरीवली – रा. 11.11 – धीमी

डाऊन दिशेच्या फेऱ्या

1)  चर्चगेट – स.6.35 वा. – बोरीवली – स. 7.41वा. – धीमी

2) चर्चगेट – स.8.46 वा. – बोरीवली – स. 9.30 वा. – जलद

3) चर्चगेट – स.10.32 वा. – बोरीवली – स. 11.18 वा. – जलद

4) चर्चगेट – दु.12.16 वा. – विरार – दु. 1.27 वा. – जलद

5) चर्चगेट – दु.3.07 वा. – विरार – दु. 4.30 वा. – जलद

6) चर्चगेट – सायं.6.22 वा. – विरार – रा. 7.46 वा. – जलद

7) चर्चगेट – रा.9.23 वा. – भाईंदर – रा. 10.43 वा. – धीमी

8) बोरीवली – रा.11.19 वा. – विरार – रा. 11.56 वा. – धीमी