Suvarnadurg Fort: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हर्णे सुवर्णदुर्ग किल्लाची जागतिक वारसा यादीत नोंद होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार असून त्यामुळं प्रशासन तयारीला लागले आहे.
18 सप्टेंबर रोजी समुद्रातील किल्ल्याची साफसफाई तसेच हर्णे सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी पूर्वतयारी केली जाणार आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणार आहे. युनोस्कोचे तज्ञ पथक 2 ऑक्टोबर रोजी किल्ल्याची पाहणी करणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित कोणाच्या हालचाली सुरू झाले आहेत. सुवर्ण किल्ले जागतिक यादीत समावेश झाल्यास जागतिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदुष्टीचे प्रतिक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले असून 2 ऑक्टोबर रोजी टीम पाहणीसाठी येणार आहे. युनेस्कोचे तज्ज्ञ पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे. युनेस्को पथकाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे.
किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोवा किल्ला ते पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला यासाठी निधीतून जेट्टी बांधण्यात येणार आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर घनकचरा व्यवस्थापन करणे, किल्ल्याच्या परिसरात गवत व मातीचा फरशीचा थर काढून टाकणे, किल्ल्याची दुरुस्ती करणे, तटबंदी भरणे, पदपथाची निर्मिती करणे तसेच इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत.
हर्णे येथे 16 व्या शतकात बांधलेले 4 किल्ले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार याच ठिकाणी होते, पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाजूलाच भुईकोट, कनकदुर्ग, फत्तेगड असे तीन किल्ले आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा प्राप्त होणार असल्याने या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे. तसेच या ठिकाणी जागतिक पर्यटक येणार असल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे.