11वी ऍडमिशनबद्दल बच्चू कडू यांची महत्त्वपूर्ण माहिती

11 वीच प्रवेश घेणाऱ्यांनी घबरू नका; वाचा काय  म्हणाले शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू  

Updated: Aug 11, 2021, 01:42 PM IST
11वी ऍडमिशनबद्दल बच्चू कडू यांची महत्त्वपूर्ण माहिती title=

पुणे : दहावीच्या मूल्यमापनाच्या आधारावर लागलेल्या निकालात छप्पर फाड के गुण मिळाल्यामुळे प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश होणार तरी कसे असा प्रश्न पडला आहे. अकरावी ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. गरज पडल्यास संख्या वाढवू मात्र एकही जण शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शाळा मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत. त्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे कारवाई होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

बच्चू कडू म्हणाले, 'ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही. एकाही मुलाला ऍडमिशन मिळणार नाही असं होणार नाही. सीईटीचे शुल्क परत मिळेल, तो त्यांचा अधिकार आहे. आमचं प्रशासन सगळं हात मिळवलेले आहे, प्रशासन त्यांच्या बाजूने उभं राहतं. शाळां मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत, म्हणून कारवाई होत नाही, त्यांना भीती वाटतेय. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपलीय, त्यामुळे कायदा बद्दलविण्याचा विचार करतोय.'

दरम्यान, अकरावीला प्रवेश घेताना मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरात नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दहावीला मिळालेल्या गुणांची मोठी टक्कर पहायला मिळते. अकरावी ऑनलाइन प्रवेशात केंद्रीय विद्यार्थी आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी 90 प्लस संघर्ष पहायला मिळतो.

दरवर्षी 90 प्लस टक्केवारीच्या आधारावरच विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालये काबीज करण्याची धडपड असते. यंदा मात्र परिस्थिती कोरोनामुळे वेगळी आहे. दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या आणि मूल्यमापनावर आधारीत निकाल जाहीर झाला.