Igatpuri Rave Party : रेव्ह पार्टीत अभिनेत्रीचा समावेश; 22 जणांना अटक

मद्यधुंद अवस्थेत असताना पोलिसांना छापा 

Updated: Jun 28, 2021, 06:59 AM IST
Igatpuri Rave Party : रेव्ह पार्टीत अभिनेत्रीचा समावेश; 22 जणांना अटक  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीत रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. या पार्टीतून 4 अभिनेत्रींसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे.  इगतपुरीतल्या मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या  स्काय ताज व्हिला बंगल्यात  ही रेव्ह पार्टी रंगली होती. या रेव्ह पार्टीतून पोलिसांनी 22 जणांना अटक केल आहे. यात 10 पुरूष आणि 12 महिलांचा समावेश आहे. या पार्टीतून 4 अभिनेत्रींना अटक करण्यात आलं आहे. यातील एका अभिनेत्रीचं नाव हिना पांचाल असं असून ती बिग बॉसमधील स्पर्धक होती.

पोलिसांनी छापा मारला त्यावेळी बंगल्यात अंमली पदार्थ, दारू, हुक्का साहित्य आढळून आली. तसच पुरूष आणि महिला बीभत्स अवस्थेत असल्याचं दिसून आलं.  घटनास्थळावरून पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, अंमली पदार्थ आणि दारू जप्त केली आहे.  हिना पांचाळ हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या चार अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह अमली पदार्थ व रोकड जप्त केली.

ऑनलाईन कपडे विक्रीचा व्यवसाय चार वर्षांपासून करणाऱ्या निरज ऊर्फ अरव ललित शर्मा व सुराणा यांची ओळख आहे. पियुष शहाच्या वाढदिवासाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी सकाळी विभा दिनेशभाई गोंडलिया या अरव, रुचिरा नार्वेकर आणि आकीब खान यांच्यासमवेत इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये थांबले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री १२ वाजता पियुषचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. दुसर्‍या दिवशी शनिवारी रात्री ८ नंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. तरुण व तरुणी मद्यधुंद व नशेत नाचगाणी, धिंगाणा करत हुक्का, चरस, गांजा व ड्रग्जची पावडरसह मादक पदार्थांचे सेवन करत होते. मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी छापा टाकला.

रेव्ह पार्टीमुळे मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येणार आहे. पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणण्यात आले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून पोलिसांनी नायजेरियन नागरिकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यास इगतपुरीत आणले आहे.