सातारा: कौटुंबिक वादातून जावायाने पत्नी सह सासूवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडलीये. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासू जागीच ठार झालीये. तर पत्नी गंभीर जखमी झालीये. आबासो काटकर असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
ठाण्यातील दिवा येथे आबासो बायको आणि आपल्या दोन मुलांसह राहत होता. मंगळवारी तो गावाला आला होता. आबासो आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता. यामुळे आबासोची पत्नी नरवणे गावाताील तिच्या मामाकडे राहायला आली होती.
पती-पत्नी यांच्यातील वादामुळे मामांनी आबासोच्या पत्नीला तिच्या आईकडे पाठवले होते. गुरुवारी रात्री आबासो सासुरवाडीला आला. यावेळी आबासो आणि पत्नीमध्ये वाद झाले. यावेळी आबासोची सासूही तेथे होती. यावेळी संतप्त झालेल्या आबासोने तलवारीच्या सहाय्याने पत्नी आणि सासूवर वार केले. हे वार इतके भयानक होते की सासू जागीच ठार झाली तर पत्नी गंभीर जखमी झालीये.