कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Updated: Jun 27, 2020, 09:24 AM IST
कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी title=

कल्याण : शहरासह कल्याण- डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. कल्याण पूर्व येथे कंटेनमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत. कोणतेही सोशल डिस्टन्स नियम न पाळता नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसागणिक रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद होत असताना नागरिकांना मात्र केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा तसेच पोलिसांचा कोणाचाही धाक उरलेला दिसत नाही हेच गर्दीवरुन दिसून येत आहे. 

 लॉकडाऊन संपल्याप्रमाणे नागरिक कंटेनमेंट झोनमध्ये रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने सम-विषम तारखेप्रमाणे दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी दोन्ही बाजूची दुकाने उघडली जात आहेत. दररोज कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खुलेआम फिरताना नागरिक कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. कल्याण- डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वाढत असून यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकही तेवढेच जवाबदार आहेत, अशी काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहे.

दरम्यान,  कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला तरी कोण्यात्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. व्यापारीवर्गही मास्क लावतांना दिसत नाहीत. लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यातच कोरोना रुग्णांत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना कसा काय नियंत्रणात येणार हाच खरा प्रश्न आहे.