पुणे : COVID-19 new strain : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला होम क्वांरटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशाची आरटीपीसीर चाचणी करण्यात आलीपासून अहवाल प्रतीक्षेत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रयोग शाळेत पाठवून जीनोम सिक्वेसिंग केले जाणार आहे. संबंधित प्रवासी 20 दिवसांपूर्वी आफ्रिकेतून पुण्यात आला होता. (Home quarantine for another passenger from South Africa in Maharashtra!)
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे पुणे महापालिका सतर्क झाली आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरु आहे. दरम्यान, लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
तसेच गेल्या चार ते पाच दिवसांत विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागात गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत.
राज्यात दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत. त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे कुटुंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता.