कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई, पोलिसाना अलर्ट राहायला सांगितलंय - गृहमंत्री

भाजपचे नेते किरीट सोमय्या कोकणात दापोलीत धडक मारली आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Mar 26, 2022, 07:55 PM IST
कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई, पोलिसाना अलर्ट राहायला सांगितलंय - गृहमंत्री title=

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या कोकणात दापोलीत  धडक मारली आहे. पहिवनमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडायला हातोडा घेऊन आलोय, असे सांगत आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे म्हणत दापोली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या भूमिकेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. कोणालाही कुठली लढाई लढायची असेल तर कायदेशीर लढली पाहिजे, कुणीही कायदा हातात घेतला तर त्या सबंधात पोलीस नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती करतील. 

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला एवढं महत्व देण्याचे कारण नाही. कोण कुठं जातंय याचा ट्रॅक नाही ठेवत. स्थानिक पोलीस कायद्याप्रमाणे काम आणि कारवाई करतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना टोला

अधिवेशनात पेन ड्राईव्ह दाखवल्याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाआहे. ही एक नवीन पद्धत काढली आहे.खोटे नाटे आरोप करायचे. केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा. आणि त्यामधून सरकारच्या बद्दल वातावरण बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा.एका बाजूला कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला छोट्या गोष्टी वरुन मोठे मोर्चे काढून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा. सरकारची प्रतिमा असल्या गोष्टींमुळे बिघडणार नाही. आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीने काम करत आहोत आणि भविष्यात करत राहणार, असे ते म्हणाले.

पुण्यातील घटना चिंताजनक 

स्टिंग चौकशीचा तो विषय सीआयडीकडे वर्ग केला आहे. ते तपास करतील. त्याचवेळी रश्मी शुल्का यांचे फोन टॅपिंग प्रकरणी त्यांनी भाष्य करण्याचे ठाळले. हा तपासाचा भाग आहे. त्यावर मी आता बोलू शकत नाही. तसेच  पुण्यातील गुन्ह्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. घडत असलेल्या घटना चिंताजनक आहे, पोलिसाना अलर्ट राहायला सांगितले आहे, असे ते म्हणाले.