मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा Rain पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. Marathwada मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण konkan या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून, २१ आणि २२ ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करतही यासंदर्भातील माहिती दिली.
'IMD GFS नुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ,मराठवाडा,द.मध्य महाराष्ट्र, द.कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता', असा इशारा देत त्यांनी बळीराजानं पिकाची काळजी घेणे आवशक्य असल्याचं सांगत सर्वांनाच सतर्क केलं. शिवाय येते काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहनही केलं.
IMD GFS नुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.विदर्भ,मराठवाडा,द.मध्य महाराष्ट्र, द.कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.पिकाची काळजी घेणे आवशक्य.कृपया IMD ने दिलेले इशारे रोज पाहणे.@RMC_Mumbai @DisasterState @CMOMaharashtra pic.twitter.com/w6mnqXO5yc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 19, 2020
As per IMD GFS guidance, there could be Thunderstorm activity over Madhya Maharashtra & parts of N Konkan, adjoining districts of marathwada today. Latest satellite image indicating start of development of convective clouds in interiors.
Please watch for IMD @RMC_Mumbai updates. pic.twitter.com/jjU3ZxRPvc— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 19, 2020
बंगालच्या उपसारगात पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी राज्यातील वातावरणावर याचे थेट परिणाम होऊन बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेला हा इशारा पाहता आधीच अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाडा आणि इतर भागातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे.