राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Rains Latest news : राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. ( Rains in Maharashtra )  

Updated: Oct 5, 2021, 01:54 PM IST
राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस title=
संग्रहित छाया

मुंबई :  Rains Latest news : राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. ( Rains in Maharashtra ) पुण्यात पावसाने विश्रांती घेतली पाहायला मिळत आहे. तर यवतमाळमध्ये जनावरं गेली वाहून तर जळगावात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. (Heavy rains with thunderstorms in Maharashtra for next four days)

या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची शक्यता आहे. यावेळी राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra weather update )

याच आठवड्यात राजस्थानातून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

वीज पडून गुराख्याचा मृत्यू

महाड तालुक्यातील कोळोसे इथं अंगावर वीज पडून गुराख्याचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. संगम साळवी असं मृत गुराख्याचं नाव असून तो चरायला सोडलेली गुरं परत आणण्यासाठी गेला होता. सोमवारी संध्याकाळी महाड परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 14 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 244 मोठी जनावरे, 230 लहान जनावरे मृत्युमुखी पडली आहे. 1600 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर, चोपडा तालुका वगळता इतर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 119 टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून गेलेत.

पुरात 25 ते 30 गायींचा कळप वाहून गेला

यवतमाळमध्ये नाल्याला आलेल्या पुरात 25 ते 30 गायींचा कळप वाहून गेल्यायत. महागाव तालुक्यातील बेलदरी इथं ही घटना घडली. पशुपालकांच्या गायी, कालवडी आणि गोऱ्हे घेऊन गुराखी परतत असताना जनावरांचा कळप नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढत होता. 

दरम्यान, परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आधीच ओसंडून वाहणा-या नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला. ज्याचा अंदाज गुराख्याला आला नाही. परिणामी पाण्यात उतरलेली जनावरं एकेक करता वाहू लागली. यावेळी गुरख्यांनी आरडाओरड करून जनावरांना वाचविण्यासाठी धडपड केली मात्र पाण्याच्या प्रवाहात अनेक जनावरांची धडपड अखेरची ठरली. त्यांचा हंबरडा आणि वाहून जातानाची दृश्यं मनाला चटका लावून गेली.