येत्या 48 तासात मुसळधार पाऊस, प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा

 येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Updated: Jul 1, 2019, 09:19 AM IST
येत्या 48 तासात मुसळधार पाऊस, प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा  title=

मुंबई : येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.कुलाबा वेधशाळेच उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी 'झी 24 तास' ला यासंदर्भात माहीती दिली आहे. मुंबईत काल रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.. तर या आठव्यात म्हणजे दोन आणि तीन जुलैला मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे. 

मुंबई आणि उपनगर तसंच नवी मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शीव परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याला जणू तळ्याचं स्वरुप आलं आहे. दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या वसाहती आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे.