लोणावळा : शनिवारपासून लोणावळा शहर आणि पवनानगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातून पाच हजार ९७० क्यूसेक पाणी पवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे या नदीजवळील ४ ते ५ गावांना आणि वाड्यांना जोडणारा शिवली पूल पाण्याखाली गेलाय. यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. लोणावळा शहरात मागील दोन दिवसात २५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.