लातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस

लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला. 

Updated: Jun 18, 2017, 07:26 PM IST
लातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस title=

लातूर : लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला. 

दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. मृग नक्षत्रातील या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्यांना सुरुवात झालीय. 

हा पाऊस लातूर, निलंगा शहर आणि परिसरात एक तासाहून अधिक काळ बरसत होता. त्यामुळे शहरात बाजारात आलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

आगामी काळातही वरुणराजा असाच बरसावा अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करतायत.