विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : खान्देशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. जिल्ह्यात उष्माघातामुळे ८ जणांचा मृत्यू झालाय. जळगावचा पारा ४६ ते ४७ अंशांवर पोहचल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करणं ग्रामस्थांसाठी जिकरीचं झालंय. वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यात ८ जणांचा बळी गेलाय. भर उन्हात शेतात काम करताना तसंच लग्नाच्या वरातीत नाचताना नागरिक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्यात.
खान्देशात उष्णतेची लाट आलीय. त्यामुळे ग्रामस्थांनी भरपूर पाणी प्यावं, उन्हात बाहेर पडू नये असं आवाहन डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून करण्यात आलंय.