विदर्भात 48 तासात पुन्हा गारपिटीची शक्यता

विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 10:11 AM IST
विदर्भात 48 तासात पुन्हा गारपिटीची शक्यता title=

नागपूर : विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

24 तासात जबरदस्त गारपीट 

अवघ्या 24 तासांत पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या पेणटाकळीत जबरदस्त गारपीट झाली. काल दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यानं शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अचानक आलेल्या गारपिटीमुळे बळीराजाला पुन्हा तडाखा बसला.

उरलं सुरलं पीकही मातीत

शेतात उरलं सुरलं पीकही मातीत गेलं आहे. केवळ पंधरा मिनिटं आलेल्या जोरदार गारपिटीनं गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

अनेक गावांना गारपिटीचा फटका

वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि वाशीम तालुक्यातील अनेक गावांना पुन्हा पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलाय. गारपिटीचा तडाखा पिकांना बसला तसाच तो पक्ष्यांनाही बसला आहे.