नाशिक : व्हॉट्सअॅप हॅक करुन अश्लील मेसेज पाठवणारा हॅकर राजस्थानात सापडला आहे. संशयित आरोपीला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानात बाडमेर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली.
मागील आठवड्यात शहरातील २८ हुन अधिक व्हॉट्सअॅप ग्रुप हॅक करून महिलांशी अश्लील भाषेत चॅटिंग केल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या हॅकरला अटक केली.