पुण्यातही ज्ञानवापी 2.0 ? मंदिर आणि दर्ग्याचा वाद पेटण्याची शक्यता

पुण्यात ज्याच्या त्याच्या ओठी ज्ञानवापी 2.0 चीच जोरदार चर्चा रंगली आहे.

Updated: May 23, 2022, 09:21 PM IST
पुण्यातही ज्ञानवापी 2.0 ? मंदिर आणि दर्ग्याचा वाद पेटण्याची शक्यता title=

सागर आव्हाड, पुणे : ज्ञानवापी, काशी, मथुरेपाठोपाठ आता पुण्यातील दर्ग्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. इथल्या दोन दर्ग्यांबाबत मनसेनं अतिशय धक्कादायक दावा केलाय. या दाव्यामुळे पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. काय आहे हे प्रकरण, पाहूयात हा रिपोर्ट

देशात ज्ञानवापी मशीद प्रकरण तापलेलं असतानाच आता पुण्यातही मंदिर आणि दर्ग्याचा वाद पेटणार आहे. कारण पुण्यातील दोन हिंदू मंदिरांच्या जागांवर दर्गे बांधल्याचा दावा मनसेनं केलाय. 

पुण्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर अशी दोन मंदिरं होती. अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार बडा अरब पुण्यावरून चाल करून आला. त्यावेळी त्यानं ही दोन्ही मंदिरं उद्ध्वस्त केली. त्याठिकाणी छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावानं दोन दर्गे बांधण्यात आले, असा दावा मनसेनं केलाय. 

पुण्यातही आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. इतिहास अभ्यासकांनी मात्र मनसेचा दावा फेटाळून लावलाय. त्या जागांवर मंदिर नव्हतं, तर दर्गाच होता आणि पेशव्यांनी या दर्ग्याला देणगीही दिली होती, असं इतिहास अभ्यासक सांगतात.

पुण्यात ज्याच्या त्याच्या ओठी ज्ञानवापी 2.0 चीच जोरदार चर्चा रंगलीय. मनसेच्या दाव्यानंतर पुणे पोलीस अलर्ट झालेत... दर्गा असलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.