आता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy

GPS Poll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खिशाला चांगलाच फटका बसतो. तरीही नित्यनियमानं आपण टोलनाक्याजवळ आपला टोल (toll) भरत आपली जबाबदारी पुर्ण करतो. 

Updated: Dec 16, 2022, 06:12 PM IST
आता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy title=
gps toll

GPS Toll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खिशाला चांगलाच फटका बसतो. तरीही नित्यनियमानं आपण टोलनाक्याजवळ आपला टोल (toll) भरत आपली जबाबदारी पुर्ण करतो. परंतु अनेकदा टोल देतानाही आपल्याला अनेक अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते किंवा आपल्याला टोल देताना काही फारसा त्रासही होत नाही. परंतु आता जसजसे तांत्रिक (technical changes) बदल होत आहेत त्यानूसार आता टोल भरण्यासाठीही तुम्हाला आता फार त्रास सहन करण्याची गरज नाही. कारण सरकार लवकरच जीपीएस (gps system) यंत्रणेद्वारे टोल ब्लेट आणणार आहे. तुम्ही विचारात पडला असाल की हा टोल ब्लेट नक्की आहे तरी काय आणि तो आपण नक्की कसा वापरू शकतो. तेव्हा जाणून घेऊया या नव्या तंत्रज्ञानाबद्दल. (government to annonce to gps system for toll at national highway news in marathi)

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला अनेक टोलनाक्यावरून टोल भरावा लागतो. आपल्याला माहिती आहेच की कधीकधी हे टोल भरताना अनेकदा गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात त्यामुळे आपल्याला खूप वाट पाहावी लागते आणि आपल्या प्रवासातही आपल्याला उशीर होतो. परंतु आता या नव्या तंत्रज्ञानामुळे कदाचित तुम्हा-आम्हाला टोल भरताना जास्त त्रास होणार नाही. सध्या सरकार या चांगल्या आणि उपयुक्त तंत्रज्ञानावर काम करत आहे. यामुळे तुम्हाला यापुढे टोल प्लाझावर, टोलनाक्यावर जाऊन टोल जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही. येत्या काळात जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोलवसुलीचे (gps toll belt in car) काम सोप्पं होणार आहे. ही जीपीएस टोल प्रणाली सुरू झाल्यानंतर कदाचित राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाकेही तुम्हाला दिसणार नाहीत. परंतु हे तंत्रज्ञान कुठेपर्यंत पुढे जाईल आणि त्यातही आणखी काही बदल होतील हेही आपल्याला लवकरच कळेल. 

हेही वाचा - Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...

हे तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर देशातील नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो. आयआयएम कोलकाता आणि भारतीय परिवहन महामंडळाने अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार टोल जमा करताना रांगेत उभ्या असलेल्या वाहनांवर सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे तेल खर्च केले जाते, अशी माहिती त्यांनी सांगितली आहे. याशिवाय वाहतूक कोंडीमुळे (traffic problem) दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी रुपयेही वाया जात आहेत. अशा स्थितीत टोलनाक्यामुळे दरवर्षी 1 लाख 45 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, अशी माहितीही समोर आली आहे. संसदीय अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती की हे मोठे नुकसान लक्षात घेऊन भारत सरकार अतिशय खास प्रकारच्या जीपीएस प्रणालीवर काम करत आहे. त्याची लवकरच देशात अंमलबजावणी होणार आहे.

कशी काम करेल ही प्रणाली? 

या प्रणालीअंतर्गत वाहनांची नंबर प्लेट असेल. ती GPS नंबर प्लेटने बदलली जाईल. या संदर्भात परिवहन मंत्रालयाने नवीन वाहनांमध्ये जीपीएस नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिले आहेत, असे कळते. याशिवाय जुन्या वाहनांमध्येही जीपीएस नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. जीपीएस नंबर प्लेट बसवल्यानंतर तुमचे वाहन टोल प्लाझा ओलांडताच तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करून टोलचे पैसे कापले जातील.