घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको काढणार दिवाळीत घरांची बंपर सोडत !

CIDCO Home : सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुषखबर आहे.  

Updated: Oct 21, 2021, 12:15 PM IST
घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको काढणार दिवाळीत घरांची बंपर सोडत ! title=

नवी मुंबई : CIDCO Home : सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुषखबर आहे. सिडको (CIDCO) दिवाळीत  ( Diwali) घरांची बंपर सोडत काढण्याची शक्यता आहे. (CIDCO Home) दिवाळीत घरांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दरम्यान कोरोना साथ रोगामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या नवीन घरांच्या सोडतीतील ताबा देण्यास एक वर्षांचा विलंब झाल्याने सिडकोने संकल्प केलेल्या घरांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.

सिडकोने प्रतीक्षा यादीवरील 3 हजार लाभार्थींना इरादा पत्रे देत आहे. सिडकोकडून महागृहनिर्मितीचा 5 उपनगरात प्रकल्प सुरु आहे.दरम्यान कोरोना साथ रोगामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या नवीन घरांच्या सोडतीतील ताबा देण्यास विलंब झाल्याने सिडकोने संकल्प केलेल्या घरांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. 

या महागृहनिर्मितीत शिल्लक राहिलेली काही घरे कोविड योद्धय़ांना तसेच गणवेशधारी कर्मचाऱ्यांना देऊन प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना देखील घरे जाहीर करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील तीन हजार लाभार्थीना इरादा पत्रे दिली जात आहेत.