घाईघाईत पुणे विमानतळाबाहेर पडत होती, पोलिसांची तिच्यावर नजर पडली, तपासणीत प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलं...

पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोलिसांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 20 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

सागर आव्हाड | Updated: Jul 4, 2023, 02:41 PM IST
घाईघाईत पुणे विमानतळाबाहेर पडत होती, पोलिसांची तिच्यावर नजर पडली, तपासणीत प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलं... title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळावर (Lohgaon Airport) सोने तस्करीचा (Gold Smuggler) पर्दाफाश केला. एका महिलेने चक्क गुप्तांगात (Private Part) लपवून तब्बल 20 लाख रुपयांचं सोनं आणलं होतं. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (Customs Department) महिलेकडून 20 लाख 30 हजार रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. हे सोने भुकटी स्वरूपात कॅप्सुलमध्ये (Capsule) भरण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमाशुक्ल विभागाने या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही महिला दुबईहून आलेल्या विमानातून पुण्यात (Dubai to Pune) उतरली होती. एक महिला सोने घेऊन येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चेकिंग वाढवली होती. दरम्यान, एक महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर जाताना सुरक्षा रक्षकांना आढळली. यामुळे त्यांचा संशय बळावला. याची माहिती त्यांनी कस्टमच्या पथकाला देऊन त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. महिलेची चौकशी सुरू केली असता महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. 

महिलेकडून 20 लाख 30 हजार रुपयांचे 423 ग्रॅम 41 मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. महिलेने गुप्तांगात सोने लपवून आणल्याने अधिकारी देखील चक्रावले होते.

पुण्यात रुग्णालयात मारामारी
पुण्यामध्ये कोयता गॅंग ची दहशत सुरू असताना पुणे शहराच्या उपनगरातील वाघोलीमधील मधील केअर हॉस्पिटलमध्ये काही तरुणांनी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरूण हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत असून यावेळी कर्मचारी मदतीची विवेचना करताना दिसून येत आहे याप्रकरणी आता पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यातून एकाला ताब्यात
त्याआधी 3 जुलैला दहशतवादी कारवायाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आल आहे. जुबेर शेख वय वर्षे 39 असं संशयिताच नाव आहे. त्याला कोंढव्यातील वजीर कॅस्केड सोसायटीमधील फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आलं. NIA आणि IB यांनी ही कारवाई केली आहे. काल पहाटे तपास पथक पुण्यात दाखल झालं. त्यांनी जुबेर शेख च्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्र देखील हस्तगत करण्यात आली आहेत. जुबेर हा आयटी इंजिनियर असल्याचं कळतं. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातून पीएफआयशी संबंधित तिघांना अटक करण्यात आली होती