ठाणे : लग्नानंतर एका तरुणीला चांगलाच धक्का बसला आहे. नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीने पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणमधली ही घटना असून या मुलाबाबत आणखी काही धक्कादायक प्रकार समोरप आले. हा मुलगा समलैंगिक असल्याने २०१५ मध्ये एका उच्चशिक्षित समलैंगिक तरुणासोबत त्याचे लग्न झाले. मात्र डिसेंबर २०१६मध्ये पुन्हा एकदा त्याचा आंबिवलीमधील एका तरुणीसोबत पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. विवाहापूर्वी तरुणाने आपण समलैंगिक असल्याची माहिती लपवून ठेवली होती. विवाहानंतर जोडप्याला एक मुलगीही झाली. मात्र नवऱ्याचा एका पुरूषाशी समलैंगिक विवाह झाल्याची माहिती कळाल्यानंतर तरुणीची पायाखालची जमीन सरकली.