गिरिश महाजन आणि गुलाबभाऊंचं 'लफडं' अखेर कॅमेऱ्यात कैद?

संपूर्ण जळगाव जिल्ह्याला माहित आहे, गिरीश महाजन हे भाजपाचे आणि गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर दुसरीकडे

Updated: Jan 27, 2022, 09:12 PM IST
गिरिश महाजन आणि गुलाबभाऊंचं  'लफडं' अखेर कॅमेऱ्यात कैद? title=

वाल्मिक जोशी, झी २४ तास, जळगाव  : संपूर्ण जळगाव जिल्ह्याला माहित आहे, गिरीश महाजन हे भाजपाचे आणि गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे राज्यात मित्रपक्ष आहेत. तर जिल्ह्यातील लोकांना हेच चित्र दिसणे अपेक्षित आहे की, गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे एकाच गाडीत असावेत. 

पण एक व्हीडिओ व्हायरल होत आहे आणि तो आजचाच आहे, ज्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे एकाच गाडीत प्रवास करतायत. हो एखाद्या कार्यक्रमात दोन विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात, एकाच व्यासपीठावर बसतात, पण एकाच गाडीत फिरताना तसे दिसत नाहीत.

तर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचं हे राजकीय लफडं तुम्हाला वाटू शकतं, पण एवढे वर्ष एकमेकांच्या सोबत असलेल्या या पक्षांच्या नेत्यांचा जीव देखील अजूनही कुठेतरी एकमेकांमध्ये अडकल्यासारखाच आहे. राजकारणापलीकडे जावून ही मैत्री असेल तर यात काही वावगं नाही, पण राजकीय लफडं असेल तर हा व्हीडिओ एकनाथ खडसे यांना देखील पाहायला आवडणार नाही.