पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आलं होतं, एवढंच करून तो थांबला नाही, त्याने या अकाऊंटवरून महिलांचे अश्लील फोटो देखील पोस्ट केले.
यावरून गिरीश बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली. अखेर ३० वर्षांचा आरोपी ऋतुराज नलावडे याला पोलिसांनी अटक केली, २२ जून रोजी हा प्रकार उघडकीस आला होता.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीच्या शिक्षिका पत्नीला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायची होती, त्याचा प्रचार करण्यासाठी आरोपीने मे महिन्यात काही बनावट अकाऊंटस तयार केले, त्यापैकी गिरीश बापट यांचं एक बनावट अकाऊंट होतं.
आरोपी स्वतःला पत्रकार म्हणवून घेतो, त्याचप्रमाणे कधीतरी 'ग्रामशासन' नावाचं साप्ताहिक काढतो. आरोपीला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आरोपीने स्वतः अश्लील फोटो टाकले नाहीत, तर कुणीतरी त्याला टॅग केले होते, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती नंतर सांगण्यात आली.