Ginger Prices Hike: टोमॅटोचे दर स्थिरस्थावर होत असतानाच आता आणखी एक झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. रोजच्या जेवणात व चहामध्ये वापरण्यात येणारे आल चारपट महाग झाले आहे. आल्याची आवक घटल्याने दरात प्रचंड वाढ झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ सोसावी लागणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमी बंगळुरूमधून येणारे आलेही तुरळक प्रमाणात येत असल्याने बाजारात आल्याची कमतरता निर्माण झाली आहे. एक किलो आल्याच्या दराने पाव किलो आले खरेदी करावे लागत आहे. किरकोळ बाजारात पाव किलो आल्यासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत.घाऊक बाजारात आले 90 ते 110 रुपये किलो आहे.
बाहेरून येणारे आले के कोवळे असल्याने ते लवकर खराब होते. परिणामी, किरकोळ बाजारात आले 180 ते 200 रुपये आणि त्यातही चांगले आले हे 220 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आले खरेदी दारांना आले खरेदी करताना कमी प्रमाणातच आले खरेदी करावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाईत फार वाढ झाली आहे. भाजीपाल्यासह तांदूळ, डाळींचे भावही वधारले आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमतींत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटोच्या दरवाढीमुळं नागरिक त्रस्त असतानाच आता इतर पदार्थांच्या किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. श्रावणात अनेक सण आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात घरोघरी जेवणावळी होत असतात. अशातच महागाई वाढत चालली असताना मेळ कसा साधायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 तारखेपासून नवे दर लागू होतील.