कैलास पूरी, पिंपरी चिंचवड : रावण सेनेचा कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या हत्येनंतर पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोन्या काळभोरला अटक केली आहे. पण अटकेपूर्वी काळभोरवरही गोळीबार झाल्याने त्याने स्वतः पोलीस स्थानकात हजेरी लावल्याची चर्चा आहे.
एकीकडे या घटना घडत असताना शहरातल्या या गॅंग सोशल मीडियावर प्रचंड कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यांचे स्वतःचे स्मार्ट नेटवर्क असल्याचंही पुढं येऊ लागलंय.
श्रद्धांजली देण्यासाठी यु ट्यूबवर टाकण्यात आलेला व्हीडीओ पाहा.ही श्रद्धांजली कोणा सामाजिक कार्यकर्त्याला दिली जात नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये गँगवॉरमध्ये ठार झालेला रावण गँगचा म्होरक्या अनिकेत जाधवला हा श्रद्धांजली वाहिली जातेय.
सोशल मीडियावर फिरणारे आणि अनेक हिट्स मिळवणारे हे व्हीडीओ पाहिल्यावर गुन्हेगारी टोळ्या आपल्या प्रचार प्रसार कशा करतायत याची चुणूक दिसून येईल.
गुन्हेगारी टोळ्या आपल्या प्रचारकी व्हीडीओतून आपल्या गुंडांचीही माहिती खुलेआम देत आहेत. गुन्हेगारी टोळ्या आपलं उदात्तीकरण करतायत. त्यांना हीट्सही चांगल्या मिळत आहेत.
मग हे सगळं सुरू असताना पोलीस काय करतायत असा प्रश्न निर्माण होतो. पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि आसपासचा भागात गावगुंड पुन्हा डोकं वर काढतायत. पोलीस मात्र हातावर हात ठेऊन व्हीडीओ पाहात बसलेत हे जास्त धोकादायक आहे.